पार्थच्या धक्कादायक पराभवानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 09:20 AM IST

पार्थच्या धक्कादायक पराभवानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 25 मे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. असाच धक्कादायक निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळाला. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. पार्थ यांच्या रूपाने पवार कुटुंबाला गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. यावेळी लोकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे,' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

'पार्थचा पराभव धक्कादायक'

'मावळमध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे आलेला निकाल हा धक्कादायक होता. पण फक्त इथंच नाही तर देशभरात लोकांनी भाजपला कौल दिला आहे. पण खचून न जाता आम्ही या भागाच्या विकासासाठी भविष्यातही प्रयत्न करू,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवारांनी सर्व शक्ती पणाला लावलेली असतानाही नेमका कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांचा पराभव झाला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितलं. त्यानंतर पार्थ पवारांना मावळमधून राष्ट्रवादीने उमेदवारी देण्यात आली. पण राष्ट्रवादीसाठी अगोदरदेखील ही जागा प्रतिकूल ठरली होती.

Loading...

शरद पवारांनीही ही जागा अवघड असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी मुलाला या मतदारसंघातून उतरवणं ही मोठी रिस्क आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण अजित पवारांनी ही रिस्क घेण्यामागे काही गणितं समोर ठेवली होती.

पार्थ पवारांसाठी मावळची निवड का?

या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नव्हता. तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांनी अनेक काळ काम केलं आहे. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं गेलं.

पार्थ पवारांची उमेदारी जाहीर झाल्यानंतर इथं विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र श्रीरंग बारणेंनी विराट विजय प्राप्त केला आहे.


VIDEO: 'राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये येतील'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...