सोलापूरच्या सभेत राज ठाकरेंनी 'वंचित बहुजन आघाडी'वर कसं केलं भाष्य?

सोलापूरच्या सभेत राज ठाकरेंनी 'वंचित बहुजन आघाडी'वर कसं केलं भाष्य?

'हे सरकार खाली खेचून नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी देशाच्या राजकीय क्षितीजावरून दूर करा'

  • Share this:

सोलापूर, 16 एप्रिल : सोलापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार खाली खेचून नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी देशाच्या राजकीय क्षितीजावरून दूर करा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. पण यावेळी राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीवरही भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी भाजपला मतदान  करू नका असं सांगत असतानाच भाजपला मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका, असंही आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांच्या या विधानाचा रोख थेट वंचित बहुजन आघाडीकडे होता. कारण सोलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हेदेखील रिंगणात असणार आहेत.

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत असतो. अशातच राज ठाकरे यांनीही हाच धागा पकडत वंचित आघाडीला मतदान न करण्याच अप्रत्यक्ष आवाहन केलं आहे.

सोलापुरात हाय-होल्टेज मुकाबला

या मतदारसंघात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी मैदानात आहेत.

कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश?

मोहोळ

सोलापूर शहर उत्तर

सोलापूर शहर मध्य

अक्कलकोट

सोलापूर दक्षिण

पंढरपूर


VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 08:11 AM IST

ताज्या बातम्या