News18 Lokmat

मोदी-शहांवर हल्लाबोल करताना ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाबाबत राज यांचं मोठं विधान

भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येवू शकतील का? असा प्रश्न राज यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 09:29 AM IST

मोदी-शहांवर हल्लाबोल करताना ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाबाबत राज यांचं मोठं विधान

मुंबई, 24 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. अशातच ठाकरे बंधुच्या मनोमिलनाबाबत राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येवू शकतील का? असा प्रश्न राज यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राज म्हणाले की, 'काही होऊ शकतं. एक माणूस (नरेंद्र मोदी) इतका बदलू शकतो तर काहीही होऊ शकतं.'

दरम्यान, मंगळवारी मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे देशावरचे संकट असून कोणत्याही परिस्थितीत हे दोघे देशाच्या राजकीय क्षितीजावर दिसता कामा नयेत. यासाठी शिवसेनेला देखील मतदान करू नका कारण सेनेला मतदान म्हणजे या दोघांना मत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आवाहन केले. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये सभा घेतल्यानंतर राज यांची मुंबईतील पहिली सभा दक्षिण मुंबईच्या काळाचौकी भागातील शहीद भगतसिंग मैदानात झाली.

या सभेत राज यांनी प्रथम मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शहीद जवानांच्या नावाने मत मागणारे आमचे PM हे फकीर नसून बेफिकिर असल्याची बोचरी टीका राज यांनी केली. मुंबईतल्या पहिल्याच सभेत राज यांनी शिवसेनेला देखील मतदान करू नका असे आवाहन केले. कारण सेनेला मतदान म्हणजे मोदी-शहा यांना मत असे राज यांनी सांगितले.

Loading...


VIDEO : राज यांचा मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...