राहुल गांधींच्या संपर्कात आहात का? मनसे अध्यक्षांनी केला खुलासा

राहुल गांधींच्या संपर्कात आहात का? मनसे अध्यक्षांनी केला खुलासा

राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा सुरू झाली. याबाबत आता राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले काही दिवस मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहे. त्यानंतर मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तसंच राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा सुरू झाली. याबाबत आता राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे.

'मी राहुल गांधी यांच्या संपर्कात नाही. मोदी-शहा यांना घालवणं हेच माझं उद्दिष्ट आहे. माझ्या भूमिकेचा कुणाला फायदा होत असेल तर होऊद्या,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनेवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे. 'शिवसेना लाचारीत घरंगळत गेलेली आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार?' असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

पण ते जाणीवपूर्वक शिवसेनेचा उल्लेख करताना दिसत नाहीत. याबाबतच त्यांना विचारलं असता राज ठाकरेंना शिवसेनेचा लाचार असा उल्लेख केला आहे.

राज ठाकरे आणि लोकसभा निवडणूक

मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र राज ठाकरे राज्यभर सभा घेत भाजपवर टीकास्त्र डागत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज यांच्या निशाण्यावर आहेत. जुने व्हिडीओ दाखवत, काही महिती दाखवत राज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भाजपला राज्यात तरी त्याचे परिणाम भोगावे लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राज यांच्या सभांचा झंझावता पाहता भाजप देखील हतबल झाल्याचं राजकीय निरीक्षक म्हणत आहे. शिवाय, त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


SPECIAL REPORT: दुष्काळामुळे गावं पडली ओस, नेत्यांनी फिरवली पाठ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 01:18 PM IST

ताज्या बातम्या