...तर मीही नरेंद्र मोदींना विरोध केला नसता : राज ठाकरे

...तर मीही नरेंद्र मोदींना विरोध केला नसता : राज ठाकरे

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना ते विरोध का आहे याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 6 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेत लोकसभा निवडणुकीबाबत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना त्यांचा विरोध का आहे याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

'मी कदाचित नरेंद्र मोद यांनाही विरोध केला नसता. पण मोदी गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात खोटं बोलले. आता गुगलवर 'फेकू' असं सर्च केलं तरी नरेंद्र मोदी असं नाव येतं. याच खोटारडेपणामुळे मी मोदींना विरोध करत आहे,' असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे:

- मोदी आधी काय बोलले होते आणि आता त्यांच्या भूमिकेत कसा बदल झाला आहे, हे मी माझ्या सभांमधून सांगणार

- भाजपचे उमेदवार निवडून देऊ नका

- मोदी, शहा हे देशावरचं संकट

- पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी बदलले

- 15 लाखांचं काय झालं?

- निवडणुका जिंकण्यासाठी युद्धसदृश्य स्थिती तयार केली

- नोटाबंदीमुळे चार कोटी रोजगार कमी झाले


SPECIAL REPORT : राज ठाकरे Vs मुख्यमंत्री फडणवीस, वाकयुद्ध आज पुन्हा भडकणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 08:50 PM IST

ताज्या बातम्या