News18 Lokmat

'शिवसेना लाचारीत घरंगळत गेली', राज ठाकरेंची जहरी टीका

'शिवसेना लाचारीत घरंगळत गेलेली आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार?' असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 10:27 AM IST

'शिवसेना लाचारीत घरंगळत गेली', राज ठाकरेंची जहरी टीका

मुंबई, 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे. 'शिवसेना लाचारीत घरंगळत गेलेली आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार?' असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे गेले काही दिवस मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहे. पण ते जाणीवपूर्वक शिवसेनेचा उल्लेख करताना दिसत नाहीत. याबाबतच त्यांना विचारलं असता राज ठाकरे यांनी शिवसेनेचा 'लाचार 'असा उल्लेख केला आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राज ठाकरे आणि लोकसभा निवडणूक

मनसेनं लोकसभा निवडणूक लढवत नाही. मात्र राज ठाकरे राज्यभर सभा घेत भाजपवर टीकास्त्र डागत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज यांच्या निशाण्यावर आहेत. जुने व्हिडीओ दाखवत, काही महिती दाखवत राज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भाजपला राज्यात तरी त्याचे परिणाम भोगावे लागणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राज यांच्या सभांचा झंझावता पाहता भाजप देखील हतबल झाल्याचं राजकीय निरीक्षक म्हणत आहे. शिवाय, त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Loading...


SPECIAL REPORT: दुष्काळामुळे गावं पडली ओस, नेत्यांनी फिरवली पाठ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...