बारामती जिंकण्यासाठी माढ्यात खलबतं, राहुल कुल यांनी घेतली मोहिते पाटलांची भेट

राहुल कुल यांनी मोहिते-पाटलांची भेट घेतल्याने बारामती मतदारसंघात राजकीय समीकरणं बदलणार का हे पाहावं लागेल.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 01:35 PM IST

बारामती जिंकण्यासाठी माढ्यात खलबतं, राहुल कुल यांनी घेतली मोहिते पाटलांची भेट

बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे.

यावेळी राहुल कुल यांनी रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील व इतर कार्यकर्त्यांबरोबर तासभर चर्चा केली आहे.

मंगळवारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली होती.

Loading...

हर्षवर्धन पाटील यांनी बारामती मतदारसंघात भाजपला मदत करण्याचं आवाहन विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं असल्याची माहिती आहे.

अशातच राहुल कुल यांनी मोहिते-पाटलांची भेट घेतल्याने बारामती मतदारसंघात राजकीय समीकरणं बदलणार का हे पाहावं लागेल.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपमधून निवडून आलेले आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे.

कांचन कुल यांच्या उमेदवारामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

रासप आमदार राहुल कुल यांचे इंदापूरमधील काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं.

त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे.

कांचन कुल यांनी सक्रिय राजकारणात फार सहभाग घेतला नसला तरीही गेल्या काही काळापासून त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.

राहुल कुल यांच्यासोबत विवाह झालेल्या कांचन यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नात्याने कांचन कुल यांच्या चुलत आत्या आहेत.

राहुल कुल हेदेखील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

पण 2014 साली पक्षाने दौंड मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट न दिल्याने त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपमध्ये प्रवेश केला.

रासपमधून आमदार झालेल्या राहुल कुल यांची गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली.

त्यातूनच आता राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने बारामतीतून उमेदवारी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...