नागपुरातून राहुल गांधींचं आश्वासन, महाराष्ट्रातही करणार शेतकरी कर्जमाफी

नागपुरातून राहुल गांधींचं आश्वासन, महाराष्ट्रातही करणार शेतकरी कर्जमाफी

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले खोटे आश्वासन खरे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी प्रत्येक गरिबाच्या खात्यात थेट 72 हजार रुपये वर्षाकाठी टाकणार आहोत'

  • Share this:

नागपूर, 4 एप्रिल : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. तीन राज्यांत आम्ही सत्ता आल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. महाराष्ट्रातही सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू,' असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे.

पंधरा लाख मिळाले का? असा सवाल करत राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात पैसे टाकण्याचंही आश्वासन दिलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले खोटे आश्वासन खरे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी प्रत्येक गरिबाच्या खात्यात थेट 72 हजार रुपये वर्षाकाठी टाकणार आहोत,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्त्वाची मुद्दे

- मी अर्थशास्त्रज्ञांना विचारले की देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का न लावता किती पैसै आपण लोकांच्या खात्यात टाकू शकू? त्यानंतर याचा आकडा आला तो 72 हजार

- खोट बोलणाऱ्याचे संबंध काही दिवसांचे असतात. मला पंधरा वीस वर्ष लोकांसोबत काम करायचे आहे. त्यामुळे मी खोटी आश्वासने देत नाही.

- आम्ही याआधी 14 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले

- यानंतर महिन्याला 12 हजार रुपयेपेक्षा कमी उत्पन्नाचा कुणी माणूस राहू नये हा आमचा प्रयत्न असेल

- गरिबीवर आमचा सर्जिकल स्ट्राईक

- अर्जुनासारखे मला एकच लक्ष दिसतेय. पाच वर्षांत 3 लाख 60 हजार प्रत्येकाच्या खात्यात टाकायचे

- उद्योगपतींच्या खात्यात पैसै टाकताना का विचारत नाही की पैसै कुठून येणार

- आम्ही तीन राज्यात दोन दिवसात कर्ज माफी केली

- उद्योगासाठी घेतलेली जमीन वापरली नाही तर परत शेतकऱ्यांना देऊ असा कायदा करू

- निवडणूकीनंतर चौकीदार जेलमध्ये असेल

- राफेलप्रकरणी निवडणुकीनंतर चौकशी होईल आणि नंतर चौकीदार जेलमध्ये असेल


VIDEO : सुप्रिया सुळे म्हणतात, 'मोदी आता परत आपल्याकडे येतील, त्यांना सांगायचं की...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 07:36 PM IST

ताज्या बातम्या