शिर्डी, 29 एप्रिल : काँग्रेसमधील नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करताना विखे पाटील यांनी उपस्थितांना 'कोणतं बटन दाबू?' असा मिश्किल प्रश्न विचारला. दरम्यान, विखे पाटील काँग्रेसवर नाराज असून नगर दक्षिण मतदारसंघानंतर शिर्डीतही विखेंना काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे.