News18 Lokmat

मोदी, पवारांसह दिग्गज मैदानात, कुणाची किती वाजता सभा?

मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 07:02 AM IST

मोदी, पवारांसह दिग्गज मैदानात, कुणाची किती वाजता सभा?

मुंबई, 22 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा सोमवारी थंडावल्या आहेत. आता राजकीय पक्षांनी चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेते आपल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात असतील.

कुणाची किती वाजता सभा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदूरबार आणि नाशिक इथं प्रचार सभा

- संगमनेरमध्ये 3 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा

Loading...

-कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांची संध्याकाळी 5 वाजता प्रचारसभा

-विरारमधे मुख्यमंत्र्यांची दु. 4 वा. सभा

- मिरारोडमधे शरद पवारांची संध्याकाळी 6 वा. सभा


VIDEO : पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी काढला चिमटा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 07:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...