'काँग्रेसचं तर ठीक आहे शरद पवार तुम्ही सुद्धा...?' मोदींचा हल्लाबोल

'काँग्रेसचं तर ठीक आहे शरद पवार तुम्ही सुद्धा...?' मोदींचा हल्लाबोल

लातुरमधील महायुतीच्या प्रचारसभेत अनेक दिवसांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एका व्यासपीठावर आले.

  • Share this:

लातूर, 9 एप्रिल : 'देशात दोन पंतप्रधानांची मागणी करणाऱ्यांना काँग्रेस पाठिंबा देते. काँग्रेसचं एकवेळ ठीक आहे पण शरद पवारही त्यांच्यासोबत आहेत. हे तुम्हाला शोभत नाही,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला आहे. लातुरमधील औसा इथं झालेल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर चौफेर टीका केली.

लातुरमधील महायुतीच्या प्रचारसभेत अनेक दिवसांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एका व्यासपीठावर आले. यावेळी दोघांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे:

काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीचा देशविरोधी विचार

2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार

पुन्हा सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना पेन्शन देणार

सशक्त आणि सुशासनयुक्त भारत तयार करणार

राष्ट्रवाद हीच आमची प्रेरणा

काँग्रेसचं घोषणापत्र नाही तर ढकोसलापत्र

विरोधकांना आपल्या वीर जवानांवर विश्वास नाही

शेतकऱ्यांना किसान योजनेचा लाभ मिळणार

आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे दिले

दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसून मारणं, ही आमची नीती

काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढला

समाजातील सर्व घटकांचा विकास करणार


VIDEO: 'डे विथ लिडर' : असा सुरू होतो नवनीत राणां यांचा दिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 12:36 PM IST

ताज्या बातम्या