माढा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्लातून नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

माढा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्लातून नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

माढ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

माढा, 17 एप्रिल : 'शरद पवार यांना वाऱ्याची दिशा लक्षात आली. ते असं कधीच काही करत नाहीत, ज्यातून त्यांचं नुकसान होईल. वाऱ्याची दिशा बदलत असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली,' असं म्हणत माढ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या अकलूज इथं सभा सुरू आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचं आयोजन केलं आहे.

विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढ्यातील दिग्गज नेते राहिले आहेत. पण काही दिवसांपूर्वीच त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आज अकलूजमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींची आजची माढा मतदारसंघासाठी ही सभा होत असली तरी बारामती मतदारसंघासाठीही हीच सभा असल्याचं भाजपने स्पष्ट केलंय. मोदी यांची बारामती मतदारसंघातील सभा रद्द झाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला बारामतीत सभा घेणार आहेत.

माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.


VIDEO : चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजांचा पलटवार, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 11:36 AM IST

ताज्या बातम्या