News18 Lokmat

नांदेडमध्ये मतदानावेळी गोंधळ, बिघाड झाल्याने बदलल्या 78 ईव्हीएम मशीन्स

नांदेडमध्ये अनेक ठिकाणी वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 09:24 AM IST

नांदेडमध्ये मतदानावेळी गोंधळ, बिघाड झाल्याने बदलल्या 78 ईव्हीएम मशीन्स

नांदेड, 18 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पण काही ठिकाणी मात्र मतदानावेळी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडमध्ये अनेक ठिकाणी वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. भोकर, नायगाव, मुखेड, नांदेड उत्तर आणि दक्षिण, देगलूर या ठिकाणी एकूण 78 मशीन बंद पडल्या. त्यानंतर प्रशासनाने या मशीन्स बदलल्या आहेत.

सोलापुरातील नेहरूनगर इथल्या क्र. 167 मतदान केंद्रावर एक तास मतदान उशिरा सुरू झालं आहे. ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे मतदान केंद्रावर मतदारांना दीड तास ताटकळावं लागलं होतं. त्यामुळे 167 क्रमांक मतदान केंद्रावरील मतदारांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाराष्ट्राच्या दहा लोकसभा मतदार संघ यासाठी सकाळी सात ते सायंकाळ सहा असे मतदान होत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

आजच्या मतदानाची काय आहेत वैशिष्ट्ये?

Loading...

10 मतदारसंघातील 20 हजार 716 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.

दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत.

या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदारसंघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत.

बुलढाणा मतदारसंघात 12 उमेदवार, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.


VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...