News18 Lokmat

पार्थ पवारांसाठी धोक्याची घंटा, मावळमध्ये भाजप-शिवसेनेचं अखेर मनोमिलन

श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 01:51 PM IST

पार्थ पवारांसाठी धोक्याची घंटा, मावळमध्ये भाजप-शिवसेनेचं अखेर मनोमिलन

मावळ, 8 एप्रिल :  मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. पण श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता. पण आता अखेर मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद मिटला आहे.

श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच मनोमिलन झालं आहे. तसंच या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं आहे. शिवसेना-भाजपचं हे मनोमिलन राष्ट्रवादीचे याठिकाणचे उमेदवार पार्थ पवार यांची डोकेदुखी वाढवणारं ठरेल, अशी शक्यता आहे.

मावळमध्ये होणार जोरदार लढत

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची मावळमधून पार्थ अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. आता जाहीर झालेल्या उमेदवारी यादीत शिवसेनेकडून बारणे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

गेल्या दोन निवडणुकांत या मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे. यावेळी मात्र हा मतदारसंघ चर्चेत आला तो राष्ट्रवादीच्या नव्या खेळीने. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितल्याने पार्थ मावळमधून लढत आहेत.

Loading...

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसेच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


VIDEO : उर्मिला मातोंडकर मोदी सरकारविरोधात आक्रमक, म्हणाल्या...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...