पार्थ पवारांचा प्रचार, शेकापच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पैसे वाटताना पकडलं

पार्थ पवारांचा प्रचार, शेकापच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पैसे वाटताना पकडलं

पनवेल भरारी पथकाने शेकाप पदाधिकाऱ्यांकडून 200 रुपयांची 29 पाकिटे जप्त केली आहे.

  • Share this:

पनवेल, 28 एप्रिल : मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करताना शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आलं आहे. सुकापूर इथं मतदारांना प्रत्येकी 200 रुपये वाटत असताना पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलं आहे.

पनवेल भरारी पथकाने शेकाप पदाधिकाऱ्यांकडून 200 रुपयांची 29 पाकिटंही जप्त केली आहे. पैसे वाटण्याबाबत भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी शेकाप कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. या सर्व प्रकारावर आता मोठी टीका होत आहे.

दरम्यान, शनिवारीदेखील भरारी पथकाने कामोठे इथं पैसे वाटप करणाऱ्या दोन शेकाप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. तसंच सहायक निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत.

या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 11 हजार 900 रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह ,फोटो व नावे असलेली यादी सापडली आहे.


VIDEO : 'मीच माफी मागतो', राहुल गांधींना 'असा' सोडवला सुरक्षारक्षक-पायलटमध्ये झालेला वादबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 02:11 PM IST

ताज्या बातम्या