News18 Lokmat

माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंहांचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 11:56 AM IST

माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंहांचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

विरेंद्रसिंह उत्पट, माढा, 22 एप्रिल : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांचा मराठा क्रांती मोर्चा कडून निषेध करण्यात आला आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.

"गुरसाळे इथल्या सभेत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांची मदत तसंच मराठा मोर्च्याच्या काळात 1400 पेक्षा अधिक युवकांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. या आश्वासनावर प्रश्न विचारल्याने चिडून मला सभेतून ओढून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली," असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केला आहे.

माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

Loading...


VIDEO : साताऱ्यातील आजींनी दिल्या शिव्या, म्हणाल्या कशाला पाहिजे सरकार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...