भाजपच जिंकणार माढा आणि बारामती, महादेव जानकरांचा दावा

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती आणि माढा या जागा आम्ही जिंकू, असा दावा याआधी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 02:08 PM IST

भाजपच जिंकणार माढा आणि बारामती, महादेव जानकरांचा दावा

सोलापूर, 4 मे : 'माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच विजयी होणार आहे,' असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगोला तालुक्यात दुष्काळाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती आणि माढा या जागा आम्ही जिंकू, असा दावा याआधी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. या मतदारसंघात विजय खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तशी मोर्चेबांधणी करण्याचाही प्रयत्न केला आहे.

माढ्यात राष्ट्रवादी Vs भाजप

रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली.

शरद पवार यांच्या या खेळीमुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने काँग्रेसमधून आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर माढ्यात आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

Loading...

बारामतीत मोर्चेबांधणी

राष्ट्रवादीच्या खासदार आणि बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे गड राखणार का ? त्यांचं मताधिक्य वाढणार की घटणार ? कमळाच्या चिन्हाचा कांचन कुल यांना किती फायदा होणार ? असे प्रश्न विचारले जात आहेत.

50- 50 लढत

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, भोर, इंदापूर या तीन विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना चांगला कौल मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. पण त्याचबरोबर दौंड, खडकवासला आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघात कांचन कुल याचं पारडं जड आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे.


टोल नाक्यावर माकडाचा डल्ला, VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2019 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...