शेवटच्या क्षणी बाजी मारण्यासाठी दिग्गज मैदानात, या 7 नेत्यांची होणार सभा

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 07:49 AM IST

शेवटच्या क्षणी बाजी मारण्यासाठी दिग्गज मैदानात, या 7 नेत्यांची होणार सभा

मुंबई, 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असणार आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे नेते आपल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात असतील.

कुणाची किती वाजता सभा?

- दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांची कराड इथं सभा

- उद्धव ठाकरेंची धारावीमधे संध्याकाळी 6 वा. सभा

Loading...

- सकाळी 9.30 वा. नितीन गडकरी यांची सांगली इथं सभा

- स. 11 वा सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा

- मुख्यमंत्री इंदापूरमध्येही दु. 4 वा. घेणार सभा

- शरद पवार बालेकिल्ला असलेल्या बारामतीत दुपारी 4 वा. घेणार सभा

- नाशिकच्या नांदगांवमध्येही शरद पवार यांची सा. 5 वाजता सभा

- असदुद्दीन ओवेसी तसेच बाळासाहेब आंबेडकर यांची देहूरोड इथं 6 वा. जाहीर सभा

- चाळीसगाव इथं धनंजय मुंडे यांची दु. 1 वा प्रचारसभा


VIDEO : पन्हाळगडावरील 'त्या' गाण्याबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 07:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...