मतदानासाठी अमेरिकेतून जोडपं नागपुरात, 3 महिन्यांची मुलगीही सोबत

पेशाने इंजिनिअर असलेले अमृत कापरे आणि अमृता कापरे हे अमेरिकेत राहणारं जोडपं मतदान करण्यासाठी अमेरिकेतून नागपुरात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 11:20 AM IST

मतदानासाठी अमेरिकेतून जोडपं नागपुरात, 3 महिन्यांची मुलगीही सोबत

नागपूर, 11 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहेत. तरुण पिढी मतदानाबाबत फारशी उत्सुकता दाखवत नसल्याची टीका नेहमी केली जात असते. पण नागपुरातील एका जोडप्याने मतदारांसमोर आदर्श उभा केल्याचं पाहायला मिळत आहे.

पेशाने इंजिनिअर असलेले अमृत कापरे आणि अमृता कापरे हे अमेरिकेत राहणारं जोडपं मतदान करण्यासाठी अमेरिकेतून नागपुरात आलं आहे. कापरे दाम्पत्यासोबत त्यांची 3 महिन्यांची मुलगीही होती. 'आमच्या मुलीच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही मतदान करत आहोत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

देशभरात मतदानाचा उत्साह

लोकसभेच्या 20 राज्यांतील 91 जागांवर तर चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आज अनेक दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. येथे नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

Loading...

पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

उत्तर प्रदेश

1.सहारनपूर 2. कैराना 3. मुझफ्फरनगर 4. बिजनौर 5. मेरठ 6.बागपत 7.गाझियाबाद 8.नोएडा.

बिहार

1.औरंगाबाद 2.गया 3. नवादा 4.जमुई


VIDEO: भाजप आमदाराने ओलांडली पातळी, अभिनंदन यांना दिली चंदन तस्कराची उपमा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2019 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...