महाराष्ट्र : तलवारीचा वापर करून धमकी दिल्याचा आरोप, भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल

हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी उन्मेष पाटलांसह इतर 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 09:35 AM IST

महाराष्ट्र : तलवारीचा वापर करून धमकी दिल्याचा आरोप, भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल

जळगाव, 8 मे : तलवारीचा वापर करून धमकी दिल्याच्या आरोपानंतर भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी उन्मेष पाटलांसह इतर 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण, शिवीगाळ आणि तलवारीचा वापर करून उन्मेष पाटील यांनी धमकी दिल्याचा आरोप एका महिलेकडून करण्यात आला होता. या मारहाणीत सोनं आणी रोख रक्कम हिसकवल्याची तक्रारही महिला फिर्यादीने केली होती. ही 2016 मध्ये घडलेली घटना आहे. कोर्टाने याप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

उन्मेष पाटील आणि जळगाव जिल्ह्याचं राजकारण

जळगाव जिल्ह्यात यंदाजी लोकसभा निवडणूक फक्त उमेदवार निवडण्यासाठी होणार नाही. जळगाव जिल्ह्याचा भावी नेता कोण? हेही ठरवणारी आहे, हे निश्चित.

जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच वर्चस्व राहिलं आहे. सतीश पाटील, सुरेश जैन, मनीष जैन यांचा अपवाद वगळला तर खडसेंना जिल्हाभर विरोध करण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी खडसेंचा गडाला अक्षरशः सुरुंग लावले. महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद या निवडणुकीत भाजपला न भूतो असं यश मिळवून दिलं. आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही नेते रिंगणात आहेत. रावेरचा गड खडसेंना राखायचा आहे तर गिरीश महाजन यांनी आपाल्या उमेदवारसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Loading...

खडसे-महाजन यांची ही निवडणूक वाटत असली तरी खरी लढाई भविष्यात जिल्ह्यावर कोण सत्ता गाजवले याची आहे. रक्षा खडसे आणि उन्मेष पाटील यांच्यामधून जिल्ह्याचा नेता कोण होईल? या वर्चस्वाची सुरुवात आहे. रक्षा खडसे अत्यंत आक्रमक नेत्या आहेत, कामाचा सपाटा, अभ्यास, मतदार संघावर पकड, गतीमान हालचाली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

उन्मेष पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा , ती साध्य करण्यासाठी टोकाला जायची तयारी, भविष्याचा अभ्यास आणि पेरणी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. खडसे- महाजन नेते असतानाही उन्मेष पाटील यांनी आमदार असतानाही तीन वर्षांत जिल्ह्यात स्वतःची नवी टीम निर्माण केली. पुढच्या पाच वर्षांत एकनाथ खडसे यांची राजकीय गतिमानता किती असेल? ती जागा निश्चित रक्षा खडसे भरुन काढतील. रक्षा खडसे यांना जिल्ह्यातील खडसे निष्ठावंतचा मोठा पाठिंबा आपसूकच मिळेल. ती त्यांची जमेची बाजू असेल.


SPECIAL REPORT: नगरमधल्या 'सैराट'चं सत्य...निघोजमध्ये 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...