News18 Lokmat

'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार?' मोदींच्या सभेत महिलेनं झळकावलं पोस्टर

'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?' असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने झळकावले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 06:37 PM IST

'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार?' मोदींच्या सभेत महिलेनं झळकावलं पोस्टर

अहमदनगर, 12 एप्रिल : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभा घेतली. या सभेवेळी एका महिलेने झळकावलेल्या पोस्टर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

'शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार?' असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स या महिलेने झळकावले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा चर्चेत आली आहे.

दरम्यान, मोदींच्या या सभेत काळे कपडे घालून आलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात आला नाही. तसंच सभेसाठी आलेल्या काही लोकांना काळ्या रंगाचं बनियान घातलं असल्यास ते उरवण्यास सांगितलं गेलं. याबाबत 'आज तक'ने वृत्त दिलं आहे.

युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी इथं सभा घेणार आहेत. पण या सभेवेळी काळ्या रंगाचं कापड अंगावर असल्या कारणाने अनेक लोकांना प्रवेश दिला जात नसल्याचं समोर आलं आहे.


Loading...


राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 12:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...