S M L

कांद्याला दीड रुपये भाव मिळाल्याने मोदींना पाठवली होती मनी ऑर्डवर, आता व्यक्त केली 'ही' इच्छा

पंतप्रधान मोदींची 22 एप्रिल रोजी नाशिकच्या पिंपळगाव इथं होणार आहे.

Updated On: Apr 21, 2019 02:28 PM IST

कांद्याला दीड रुपये भाव मिळाल्याने मोदींना पाठवली होती मनी ऑर्डवर, आता व्यक्त केली 'ही' इच्छा

नाशिक, 21 एप्रिल : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी शासनाकडे पत्र पाठवून परवानगी मागितली आहे. पंतप्रधान मोदींची 22 एप्रिल रोजी नाशिकच्या पिंपळगाव इथं होणार आहे.

कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यानंतर संजय साठे यांनी 29 सप्टेंबरला कांदा विक्रीतून मिळालेले 1 हजार 64 रुपयांची मनीऑर्डर पंतप्रधानांना केली होती. त्यावेळी प्रतिकांद्याला 1 रुपया 40 पैसे इतका भाव मिळाला होता .


संजय साठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांना मेल करून पंतप्रधानांना भेटण्याची परवानगी मागितली असून शासन व प्रशासन त्यांना परवानगी देतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.


SPECIAL REPORT: दुष्काळामुळे गावं पडली ओस, नेत्यांनी फिरवली पाठ

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 02:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close