'समीर भुजबळांना विजयी करा', शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावाने मेसेज आल्याने खळबळ

न निवडणुकीत हा प्रकार घडल्याने युतीचे कार्यकर्ते मात्र चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 07:06 AM IST

'समीर भुजबळांना विजयी करा', शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावाने मेसेज आल्याने खळबळ

नाशिक, 28 एप्रिल : 'नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी समीर भुजबळ यांना विजयी करा,' असे मेसेज शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावाने नाशिकमध्ये फिरत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदानाला काही तास बाकी आहेत. अशातच नाशिकमध्ये युतीतील नेत्यांच्या नावाने राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मदत करण्याचे खोटे मेसेज प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहेत. BW-NASHIK हा अकाऊंटवरून हे मेसेज पाठवण्यात येत आहेत.

याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि पालिकेची विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आहे. तर सिन्नरचे शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

खोट्या मेसेजेसबाबत नेत्यांकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता यामागे नक्की कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी पोलिसांचा सायबर सेल कामाला लागला आहे. खोडसाळपणातून हा प्रकार करण्यात आला की राजकीय लाभासाठी कुणी ठरवून हे केले, याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, ऐन निवडणुकीत हा प्रकार घडल्याने युतीचे कार्यकर्ते मात्र चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

Loading...


SPECIAL REPORT : उदयनराजे, धनंजय मुंडे आणि महाजनांचा काय आहे फिटनेस मंत्रा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 07:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...