अहमदनगर : शेवटच्या क्षणी सुजय विखेंच्या पत्नीनेही दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर : शेवटच्या क्षणी सुजय विखेंच्या पत्नीनेही दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर लोकसभा मतदार संघातून सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • Share this:

अहमदनगर, 4 एप्रिल : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनीही शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही कारणामुळे जर आपला उमेदवारी अर्ज बाद झाला तर पर्यायी उमेदवार म्हणून अर्जाची छानणी होईपर्यंत अनेकदा कुटुंबातील एका व्यक्तीचा अर्ज दाखल केला जातो.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी अचानक धनश्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर रंजन कोळसे या सूचक आणि अनुमोदक असून धनश्री यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


Loading...


नगरमध्ये राष्ट्रवादी Vs भाजप लढत

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुयज विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अहमदनगर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असताना ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, यासाठी सुजय विखे यांनी बराच हट्टही केला होता. परंतु तसं करण्यास राष्ट्रवादीने नकार दिला. त्यानंतर सुजय यांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.


VIDEO : काँग्रेसचे बंडखोर नेते भाजपात दाखल होणार? दानवे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...