'भाजप नेत्यांना कसली एवढी मस्ती चढली आहे?' धनंजय मुंडे आक्रमक

'भाजपाच्या नेत्यांना कसली एवढी मस्ती चढली आहे? आपल्या मतदारांनाच म्हणतात की तुमच्या 600-700 मतांनी आम्हाला काही फरक पडत नाही.'

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 08:31 AM IST

'भाजप नेत्यांना कसली एवढी मस्ती चढली आहे?' धनंजय मुंडे आक्रमक

बीड, 14 एप्रिल : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराचा आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशातच आता बीडमधील एका प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'भाजपाच्या नेत्यांना कसली एवढी मस्ती चढली आहे? आपल्या मतदारांनाच म्हणतात की तुमच्या 600-700 मतांनी आम्हाला काही फरक पडत नाही. माझी लढाई कोणा एका व्यक्ती विरोधात नाही पण या अहंकाराविरोधात आहे,' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

बीडमध्ये दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. वास्तविक शिवसंग्राम हा पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. असं असताना बीडमध्ये मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

पंकजा मुंडेंची मेटेंवर टीका

Loading...

"मुंडे साहेबांची शिकवण आहे मोडेन पण वाकणार नाही. हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. मी साष्टांग दंडवत घेईल, पण फक्त जनतेसमोर. बाकी कोणासमोर झुकणार नाही. मी स्टँडर्ड राजकारण केलं आहे. मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे विनायक मेटेंवर निशाणा साधला आहे.


SPECIAL REPORT : उदयनराजेंना शिवसेनेच्या 'वाघा'ची धमकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 08:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...