बीड लोकसभा : अमरसिंह पंडित आणि राष्ट्रवादीचं तिकीट, धनंजय मुंडे म्हणतात...

बीडच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांचंही नाव चर्चेत होतं.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 11:54 PM IST

बीड लोकसभा : अमरसिंह पंडित आणि राष्ट्रवादीचं तिकीट, धनंजय मुंडे म्हणतात...

बीड, 4 एप्रिल : बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. पण त्याआधी बीडच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांचंही नाव चर्चेत होतं. त्यामुळे पंडित यांना डावलून बजरंग सोनवणेंना तिकीट दिल्याने पंडित समर्थकांमध्ये नाराजी होती. तसंच धनंजय मुंडे यांनी आपल्या मित्राचा विश्वासघात केल्याची चर्चाही सुरू झाली. पण या सगळ्या वादावर पडता टाकत मुंडे-पंडित आता पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.

'बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सर्वात आधी भैय्यासाहेब अमरसिंह पंडित यांच्या नावाची सूचना मीच केली. जिल्हा परिषदेत आम्ही एकत्र निवडून आलो, तेव्हा पक्ष वेगळे असतील पण आमचा गहरा याराना होता. आजही आमच्या संबधांना वारासुद्धा छेदून जाऊ शकत नाही, तर हे कोण आहेत फुट पाडणारे?' असं ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी अमरसिंह पंडित यांच्याबरोबर आपली अजूनही चांगली मैत्री असल्याचं दाखवून दिलं आहे.दरम्यान, बीडमध्ये राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना आव्हान देत आहेत. दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Loading...


VIDEO : सुप्रिया सुळे म्हणतात, 'मोदी आता परत आपल्याकडे येतील, त्यांना सांगायचं की...'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 11:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...