लोकसभा निकालाआधी राज्यात हालचालींना वेग, विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता

लोकसभा निकालाआधी राज्यात हालचालींना वेग, विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता

मुंबईत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या विधानसभा आमदारांची बैठक होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मे : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना हटवल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर नियु्क्तीबाबत आज बैठक होत आहे. मुंबईत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या विधानसभा आमदारांची बैठक होणार आहे.

राधाकृष्ण विखे यांच्या जागी विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले बाळासाहेब थोरात तसंच विजय वड्डेटीवार यांची नावे चर्चेत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस आमदारांचा विरोध असल्याने विदर्भातील विजय वड्डेटीवार यांना प्राधान्य द्यावे असा सूर पुढे येत आहे.

विजय वडेट्टीवार यांचं नाव का आलं चर्चेत?

विदर्भात काँग्रेसचं बळकटीकरण करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांचा फायदा होईल, असं सांगण्यात येत आहे. पण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे वडेट्टीवार यांच्याशी असलेले चांगेल संबंध हे यामागचं मुख्य कारण आहे, असं म्हटलं जात आहे.

गटनेतेपदी बाळासाहेब थोरात?

अहमदनगर येथील विखे यांचे काँग्रेस पक्षातील कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांना गटनेते जबाबदारी देण्याच्या हालचाली आहे. थोरात हे तब्बल पाचपेक्षा जास्त वेळा विजयी झालेले आमदार आहेत. तसंच राज्यात कृषी, शिक्षण, महसूल अशा खात्याचे मंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे थोरात यांना ताकद देत विखेंना शह देण्याची खेळी हायकमांड करू शकते. थोरात यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यांची प्रतिमा पक्षाला फायद्याची ठरेल. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही थोरात यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे गटनेतेपदासाठी थोरातांचं नाव चर्चेत आहे.

विखेंचा राजीनामा

नगरमध्ये मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. पण काँग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. विखेंच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेसनेही बाळासाहेब थोरातांना ताकद देण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डीतील सभेतनंतर थोरातांकडे केलेल्या मुक्कामाचीही जोरदार चर्चा झाली.


EXIT POLL VIDEO : शरद पवारांची चिंता खरी ठरणार, अजितदादांना बसू शकतो धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 09:00 AM IST

ताज्या बातम्या