Elec-widget

'EVM स्ट्राँग रूममध्ये जॅमर बसवा', अशोक चव्हाणांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

'EVM स्ट्राँग रूममध्ये जॅमर बसवा', अशोक चव्हाणांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

ईव्हीएमबाबतच्या विविध मागण्यांच्या संदर्भात काँग्रेस नेत्यांकडून मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली आहे. ईव्हीएमबाबतच्या विविध मागण्यांच्या संदर्भात काँग्रेस नेत्यांकडून ही भेट घेण्यात आली आहे.

'ईव्हीएमबाबत खबरदारी घेतली पाहिजे. सर्व ईव्हीएम या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन्सला कुणी मोबाईल टॉवर, वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून टॅम्पर करू नये, म्हणून जॅमर बसवण्यात यावेत. तसंच प्रत्येक राउंड निकाल जाहीर केला पाहिजे,' अशा मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत.

शरद पवारांचंही ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमबाबत भाष्य केलं होतं. 'बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?' अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने जोरदार ताकद लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते. त्यामुळे ही जागा जिंकण्याचा दावा भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच माढ्यातून तुम्ही उभा राहू नका, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना दिला होता.

Loading...

याबाबत पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'देशभरात ईव्हीएमबाबत अनेकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना?'

'...तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल'

'ईव्हीएम छेडछाड झाली तर एखादा माणूस संसदेत जाईल. पण त्यामुळे संसदीय लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात होईल. यातून लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासही उडू शकतो,' असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.


VIDEO: स्मृती इराणी रडक्या, नवज्योत सिद्धू यांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 01:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...