निवडणुकीनंतर नाना पटोले अडचणीत येण्याची शक्यता

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 11:12 AM IST

निवडणुकीनंतर नाना पटोले अडचणीत येण्याची शक्यता

नागपूर, 17 एप्रिल : नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नायब तहसीलदारांची सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यामुळे नाना पटोले अडचणीत येण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या आदेशाची वस्तुस्थिती लक्षात न घेता ट्वीट करून दिशाभूल करणारा मजकूर अपलोड केल्याचा आरोप करत नाना पटोलेंविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नागपूरमध्ये कोण मारणार बाजी?

नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी दिली. तर काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नागपूरात गुरु विरुद्ध शिष्य असा सामना रंगला. नागपूर लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झालं आहे. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना डावलून काँग्रेसने नागपुरातून पटोलेंना तिकीट दिलं. पटोले हे मुळचे काँग्रेसचेच होते. गडकरींनी पटोलेंना भाजपमध्ये आणले. 2014मध्ये ते निवडूनही आले होते. गडकरी समर्थक अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र नंतर मोदींशी बिनसल्याने त्यांनी भाजपला राम राम केला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Loading...


VIDEO : चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजांचा पलटवार, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...