निवडणुकीच्या धामधुमीत बारामतीत मोठी कारवाई, भरारी पथकाकडून रोकड जप्त

निवडणुकीच्या धामधुमीत बारामतीत मोठी कारवाई, भरारी पथकाकडून रोकड जप्त

फॉर्च्युनर गाडीतून तब्बल नऊ लाख 70 हजार रुपये इतकी रक्क ताब्यात घेण्यात आली आहे.

  • Share this:

बारामती, 6 एप्रिल : बारामती लोकसभा मतदारसंघात रारी पथकाने मोठी कारवाई करत रोकड जप्त केली आहे. या मतदारसंघातील सरडेवाडी टोल नाक्यावर फॉर्च्युनर गाडीतून तब्बल नऊ लाख 70 हजार रुपये इतकी रक्क ताब्यात घेण्यात आली आहे.

भरारी पथकाने रोख रकमेसह एका व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीकडे असलेल्या रकमेचा तपशील त्याच्याकडे नसल्याने भरारी पथकाने संबंधित व्यक्तीवर ही कारवाई केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने केलेली ही कारवाई सध्या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. याबाबत आता पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर भाजपच्या कांचन कुल यांचं आव्हान असणार आहे.


VIDEO : भाजपविरोधात सभेबद्दल राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 10:01 PM IST

ताज्या बातम्या