अकोल्यात मतदाराने चक्क EVM फोडलं, पोलिसांनी घेतलं ताब्यात

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पण काही ठिकाणी मात्र मतदानावेळी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 11:52 AM IST

अकोल्यात मतदाराने चक्क EVM फोडलं, पोलिसांनी घेतलं ताब्यात

अकोला, 18 एप्रिल : अकोला मतदारसंघात एका मतदाराने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. ईव्हीएम फोडणाऱ्या श्रीकृष्ण घ्यारे या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाळापूर तालुक्यातील कवठा मतदानकेंद्रावर ही घटना घडली आहे.

ईव्हीएम फोडल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी श्रीकृष्ण प्यारे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर या मतदानकेंद्रावर नवीन ईव्हीएम देण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पण काही ठिकाणी मात्र मतदानावेळी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडमध्ये अनेक ठिकाणी वोटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. भोकर, नायगाव, मुखेड, नांदेड उत्तर आणि दक्षिण, देगलूर या ठिकाणी एकूण 78 मशीन बंद पडल्या. त्यानंतर प्रशासनाने या मशीन्स बदलल्या आहेत.

सोलापुरातील नेहरूनगर इथल्या क्र. 167 मतदान केंद्रावर एक तास मतदान उशिरा सुरू झालं आहे. ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे मतदान केंद्रावर मतदारांना दीड तास ताटकळावं लागलं होतं. त्यामुळे 167 क्रमांक मतदान केंद्रावरील मतदारांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Loading...


SPECIAL REPORT : 'लाव रे तो व्हिडिओ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...