बारामतीचा बालेकिल्ला राखण्यासाठी अजित पवार मैदानात, 6 सभा घेणार

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुक्यावर मजबूत पकड आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 09:02 AM IST

बारामतीचा बालेकिल्ला राखण्यासाठी अजित पवार मैदानात, 6 सभा घेणार

बारामती, 17 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पराभूत करू, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीकडूने आपला बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुक्यावर मजबूत पकड आहे. ते स्वत: विधानसभेला याच मतदारसंघातून निवडून जात असतात. त्यामुळे लोकसभेला या तालुक्यातून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य देण्यासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. आज बारामती तालुक्यात अजित पवार तब्बल सहा सभा घेणार आहेत.

विद्यमान खासदार आणि उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ अजित पवार हे निरावागज सांगवी, माळेगाव ,वडगाव निंबाळकर, करंजेपूल, सुपा या ठिकाणी सभा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

सुप्रिया सुळेंविरुद्ध लढणाऱ्या कोण आहेत भाजप उमेदवार कांचन कुल?

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपमधून निवडून आलेले आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांच्या उमेदवारामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

Loading...

रासप आमदार राहुल कुल यांचे इंदापूरमधील काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे. कांचन कुल यांनी सक्रिय राजकारणात फार सहभाग घेतला नसला तरीही गेल्या काही काळापासून त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.

राहुल कुल यांच्यासोबत विवाह झालेल्या कांचन यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नात्याने कांचन कुल यांच्या चुलत आत्या आहेत.

राहुल कुल हेदेखील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पण 2014 साली पक्षाने दौंड मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट न दिल्याने त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपमध्ये प्रवेश केला.

रासपमधून आमदार झालेल्या राहुल कुल यांची गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली.त्यातूनच आता राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने बारामतीतून उमेदवारी दिली आहे.

बारामती मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

बारामती

दौंड

इंदापूर

पुरंदर

भोर

खडकवासला


पुण्यात पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर इथं लपले LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 08:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...