Elec-widget

मोदी खरंच तुमचे शिष्य आहेत का? शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

मोदी खरंच तुमचे शिष्य आहेत का? शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

'मी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलो,' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. नरेंद्र मोदींच्या या विधानाची मोठी चर्चाही झाली.

  • Share this:

सोलापूर, 3 एप्रिल : 'नरेंद्र मोदी हे माझे कोणत्याही प्रकारचे शिष्य नाहीत. ते संघ परिवारातील आहेत. त्यामुळे आमचा त्यांच्याशी संबंध नाही,' असं वक्तव्य सोलापुरातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

'मी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलो,' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. नरेंद्र मोदींच्या या विधानाची मोठी चर्चाही झाली. त्यामुळे आता स्वत: शरद पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे. तसंच यावेळी पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीकाही केली.

राज्य सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. सत्तेत आल्यानंतर आरक्षण देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं मात्र ते आश्वासन पाळलं नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

पवार म्हणाले, माझ्या कुटुंबाची चिंता करण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी पक्ष हा जनतेने स्थापन केलेला आहे. ज्यांना कुटुंब नाही त्यांनी कुटुंबातले ऐक्याबाबत काही बोलू नये. कुटुंब चालवण्याचा त्यांना अनुभव आहे की नाही ते माहित नाही.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे

Loading...

आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले मात्र विद्यमान सरकार ते आरक्षण लागू करत नाही.

पंतप्रधान मोदींनी इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचे भुमीपूजन केले मात्र अद्याप काहीही केले नाही. केवळ भूमीपूजन करुन आंबेडकरी जनतेची धूळफेक केली.

पंतप्रधान मोदींनी इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचे भुमीपूजन केले मात्र अद्याप काहीही केले नाही. केवळ भूमीपूजन करुन आंबेडकरी जनतेची धूळफेक केली.


VIDEO : पार्थबद्दल फेसबुकवर पोस्ट का लिहिली? रोहित पवारांनी दिलं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...