• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मग आता मुजरा करायला का गेलात?' उद्धव ठाकरेंवर धनंजय मुडेंची खोचक टीका
  • VIDEO : 'मग आता मुजरा करायला का गेलात?' उद्धव ठाकरेंवर धनंजय मुडेंची खोचक टीका

    News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 05:52 PM IST | Updated On: Mar 30, 2019 05:52 PM IST

    मुंबई, 30 मार्च : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज गुजरातच्या गांधीनगरमध्ये लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. यावेळी त्यांची भव्य सभा झाली. या भेटीवरूनच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अफजल खानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत, असं वक्तव्य अमित शहांबाबत केलं होतं. मग आता असं नेमकं काय झालं, अशी कोणती ईडीची पीडा टाळण्यासाठी उद्धव ठाकरे साहेब अफजल खानाच्या शामियान्या मध्ये अफझलखानाला मुजरा करायला जात आहेत, याचं उत्तर महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांच्याकडून मागत आहे,' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close