News18 Lokmat

'...तर मी राजकारणच सोडून देईल', धनंजय मुंडेंचं पंकजा यांना 'ओपन चॅलेंज'

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे भगिनींना दिलं आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 09:30 PM IST

'...तर मी राजकारणच सोडून देईल', धनंजय मुंडेंचं पंकजा यांना 'ओपन चॅलेंज'

बीड, 3 एप्रिल : 'बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये एकाही नवीन पाझर तलावाचे काम झालेलं नाही. एखादा तलाव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी दाखवून दिला, तर मी राजकारण सोडून देईल,' असं आव्हान राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे भगिनींना दिलं आहे.

'बीड जिल्ह्यातील 78 प्रकल्प जे प्रलंबित आहेत त्यांना आघाडी सरकारच्या कालावधीत पाणी उपलब्धी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. मात्र सत्तांतर झाल्यानंतर ते प्रस्ताव कार्यान्वित करणं इथल्या पालक मंत्र्यांची जबादारी होती. पण त्या 78 प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प आमच्या दोन्ही बहिणींना गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असताना पूर्ण करता आला नाही आणि निधी आणता आला नाहीत,' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

सरकारवर टीकेची झोड

'दुष्काळात होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यातील जनता पाणी-पाणी करत असताना खोटं आश्वासन देत तुम्ही लोकांची फसवणूक केली आहे. पाच वर्षांत मोठ्याच्या लेकी या मोठेपणाने मिरवलात पण या जिल्हय़ाला आणखी मागास केलं. जिल्ह्यात ना सिंचन प्रकल्प आले, ना रेल्वे आली, ना ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटले. जिल्ह्यात कुठला नवीन प्रकल्प आणला? रेल्वेचे डबे बनवायची फैक्ट्री या जिल्ह्य़ात यायला पाहिजे होती. मात्र ती लातूरला गेली मग ते खासदार मोठे की हे? परळी ज्योतिर्लिंग हे केंद्रांच्या गॅझेटमधून वगळण्यात आलं. सगळय़ा सत्ता असतांना काही करता आले नाही. मग मुंडे साहेबांचं वारसदार म्हणून घेणारे त्यांचं स्वप्न पूर्ण करतात का? असा सवाल करत धनंजय मुंडेंनी भाजप आणि पंकजा मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला.


Loading...

चंद्रकांत पाटील बारामतीत हे काय बोलले, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...