माढ्यामध्ये नवी घडामोड, भाजपला मोठा दिलासा

माढ्यामध्ये नवी घडामोड, भाजपला मोठा दिलासा

दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

माढा, 30 मार्च : राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. अशातच आता धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हेदेखील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण मी निवडणूक लढवणार नसून युतीच्या उमेदवाराला म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा आज उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आहे.

'धनगर समाजाला जो पर्यंत जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत कोणतीही पद घेणार नाही. धनगर समाजाला भाजपच न्याय देऊ शकेल. मला आणि गोपिचंद पडळकर यांना तिकीट मिळावं अशी इच्छा होती. मी निवडणूक लढवू शकतो पण निवडून येण्याची खात्री नाही. त्यामुळे समाजाचं हित भाजपबरोबर जाण्यात आहे, म्हणून मी युतीला पाठिंबा देत आहे,' अशी घोषणा उत्तम जानकर यांनी केली आहे.

धनगर समाजाचे नेते असलेल्या उत्तम जानकर यांनी लोकसभेबाबतचा निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य करणार, अशी भूमिका आता उत्तम जानकर यांनी याआधीच स्पष्ट केली होती.

माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यामध्ये लढत होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची चार लाख मते आहेत. त्यामुळे उत्तम जानकर यांचा पाठिंबा भाजपसाठी फायद्याचा ठरणार आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उत्तम जानकर यांना समाजाकडून निवडणूक लढण्याचा दबाव आहे, असं सांगण्यात येत आलं होतं.


Loading...

VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...