भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पैशांची ऑफर, काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा

भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पैशांची ऑफर, काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा

काँग्रेस आमदाराने केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे.

  • Share this:

अमरावती, 2 एप्रिल : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून भाजपात जाण्यासाठी पैशाची ऑफर दिली होती,' असा धक्कादायक दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव व तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. काँग्रेस आमदाराने केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे.

'आम्ही विचार धारेवर चालणारे लोक आहोत. परवा मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून पैशाची ऑफर दिली होती आणि भाजपामध्ये सामील व्हा, असं ते मला म्हणाले. परंतु पैसे माझ्यासाठी महत्वाचे नाहीत, विचार महत्त्वाचा आहे,' असं सांगत  आमदार यशोमती ठाकूर यांनी खळबळ उडवून दिली आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवार नवणीत राणा यांची प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांबाबत हा धक्कादायक दावा केला आहे.

'माझे वडील स्वर्गीय भय्यासाहेब ठाकूर हे आमदार असताना त्या काळात त्यांना पक्षानं उमेदवारी नाकारली होती. मात्र ते खचले नाहीत. आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचार धारेवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे आमच्यासाठी पैशापेक्षा विचार महत्वाचा आहे,' असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांबाबत केलेल्या दाव्यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Loading...


VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 09:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...