पुण्याच्या उमेदवारीवरून अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल

या निवडणुकीत भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 06:32 PM IST

पुण्याच्या उमेदवारीवरून अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल

पुणे, 3 एप्रिल : 'पुण्याचा जर विकास केला असेल तर मग भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांची उमेदवरी का बदलली,' असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सभेत केला आहे.

या निवडणुकीत भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापलं. उमेदवार निवडीपूर्वी भाजपनं सर्व्हे केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आता याच उमेदवार बदलीवरून अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

गिरीश बापटांकडून प्रत्युत्तर

'पुण्याचा विचार करता उमेदवार बदलणं आणि विकास याचा संबंध नाही. अजित पवार यांनाही हे चांगलंच माहिती आहे,' असं उत्तर भाजपचे पुणे मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिलं आहे.

लोकसभा निवडणूक 2019

Loading...

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी


VIDEO : लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रियाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...