Khandesh Rain: नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

नवापूर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन संसार उपयोगी वस्तु आणि गाड्या वाहुन गेल्या

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2018 11:48 AM IST

Khandesh Rain: नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात एका रात्रीत पडलेल्या पावसाने तब्बल तीन जणांचा मृत्यु झाला असन दोन जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसाने तालुक्यातील सरपणी, रंगावली अशा प्रमुख नद्यांना पूर आला आहे. रंगावली नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नवापूर शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. नवापुर तालु्क्यात शुक्रवारी पहाटे जवळपास १४० मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

या मुसळधार पावसाने तालुक्यातील सरपणी, रंगावली अशा प्रमुख नद्यांसह मुख्य नद्यांना पूर आला होता. रंगावली नदी सकाळच्या सत्रात धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नवापूर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन संसार उपयोगी वस्तु आणि गाड्या वाहुन गेल्यात. विसरवाडी परिसरात वाडी शेवाडी पकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदींला आलेल्या पुरात बालाहाट येथील जामनाबाई लाश्या गावित या महिलेचा मृत्यु झाला आहे. तिचा नवरा झाडाला लटकल्याने तो मात्र थोडक्यात वाचला आहे. खोकसा येथे पुराच्या पाण्यात घर पडून वंतीबाई बोधल्या गावित या महिलेचा मृत्यु झाला आहे.

चिंचपाडा येथे देखील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याची ओळख पटणे अजून बाकी आहे. नवापूर शहरातील मिनाबाई कासार आणि वाघाळीपाडा येथील काशीराम गावित हे दोन जण अजूनही बेपत्ता असून प्रशासन आणि त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. पाणाबारा गावाजवळ पुल खचल्याने अमरावती- सुरत महामार्गावरची वाहतुक विसरवाडीपासुन नंदुरबारकडे वळवण्यात आली आहे. या पाण्याने तालुक्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पशुंच्या मृत्युचीही मोठे आकडेवारी समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने पुरात अडकलेल्या अनेक कुटुंबांची सुटका केली असुन, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

हेही वाचा-

Vidharbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान, हेमलकसाशी संपर्क तुटला

Loading...

नंदुरबारमध्ये पुराचे थैमान, 5 जणांचा मृत्यू

PHOTOS : साताऱ्यात पाणीच पाणी, ढोल्या गणपती मंदिरात शिरलं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2018 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...