महिलांचं गर्भाशय काढण्याचं प्रकरण, दक्षता समित्या स्थापन करणार

बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांचे मोठ्या प्रमाणावर गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 06:17 PM IST

महिलांचं गर्भाशय काढण्याचं प्रकरण, दक्षता समित्या स्थापन करणार

मुंबई, 1 जुलै : बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला दक्षता समिती स्थापन करण्यात याव्यात अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज केली. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्याबाबतची सूचनाही त्यांनी केलीय.

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक विधानभवनात घेण्यात आली. यावेळी आमदार विद्या चव्हाण यांच्यासह समितीचे इतर सदस्यही उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात ऊस तोडणीला जाणाऱ्या महिलांचे मोठ्या प्रमाणावर गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या संदर्भात 18 जून रोजी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नावर चर्चा झाली होती. यावेळी राज्यस्तरावर महिला आमदार व विशेषज्ञांची समिती गठित करण्याचे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार 26 जून रोजी विधानसभेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती.

शिर्डीत प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लुटणारी परप्रांतीय महिला गजाआड

आज झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. गर्भाशय शस्त्रक्रिया करण्याबाबत तज्ज्ञांच्या मदतीने एसओपी करण्याची कार्यवाही सुरु असून त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या हंगामासाठी ऊसतोडणीकरिता जाणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी मोहिम हाती घ्यावी अशा सूचनाही गोऱ्हे यांनी केल्या. बीड जिल्ह्यामध्ये परळी, अंबेजोगाई आणि बीड येथे असलेल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये गभार्शय शस्त्रक्रियेबाबत आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर या जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांना यासंदर्भात रिसोर्स सेंटर म्हणून दर्जा असंही सांगण्यात आलंय.

Loading...

ठाणे, पालघरमध्ये उद्या 'रेड अलर्ट'; मुंबईसह इतर ठिकाणी काय असणार स्थिती?

बीड जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधण्यासाठी आणि या क्षेत्रातील संघटनांशी चर्चा करण्यासाठी समिती सदस्य लवकरच बीड येथे भेट देणार आहेत. त्याचबरोबर साखर आयुक्त, कामगार आयुक्त आणि विविध सामाजिक संस्थांसेाबत बैठक घेण्याचा देखील निर्णय यावेळी घेण्यात आला. जनआरोग्य अभियान, महाराष्ट्र महिला हक्क परिषद, महिला किसान अधिकार मंच या संघटनांनी सादर केलेल्या निवेदनाबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 1, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...