S M L
Football World Cup 2018

बारावीचा निकाल कसा आणि कुठे पाहाल?

Samruddha Bhambure | Updated On: May 30, 2017 12:56 PM IST

बारावीचा निकाल कसा आणि कुठे पाहाल?

30 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल आज (मंगळवारी) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

राज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436 मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या 5 लाख 59 हजार 423 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 5 लाख 9 हजार 124 विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या 3 लाख 73 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तसंच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या 62 हजार 948 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. याच वेबसाईटवर निकाल डाऊनलोडही करता येईल.

या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

mahresult.nic.in

mahresult.nic.in

results.nic.in

examresults.net

मोबाइलवर निकाल : बीएसएनएल-धारकांनी  MHHSC<space><seat no>  असे टाइप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल प्राप्त होईल. तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा मोबाइलधारकांनी MAH12 <space><Roll Number> असे टाइप करून 58888111 या क्रमांकावर एसएमएस केल्यास निकाल मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2017 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close