शिवसेनेचा दणका, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार

शिवसेनेचा दणका, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार

सरकारच्या या निर्णयामुळे कोणाला कर्जमाफी झाली, कोणाला का नाकारली याची सर्व माहितीच सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

  • Share this:

मुंबई 23 जुलै :आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याची यादी पंधरा दिवसांत जाहीर करा, अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे...! असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे सहकार विभाग आता कामाला लागलंय.  राज्यातील ज्या शेतकर्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली. आणि कोणाला नाकारली, त्याची संपूर्ण यादी दोन दिवसांत सहकार विभागाच्या तालुकास्तरावरील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात लावण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतलाय. त्यामुळे कोणाला कर्जमाफी झाली, कोणाला का नाकारली याची सर्व माहितीच सर्वसामान्य शेतकर्यांना उपलब्ध होणार आहे.

बारामतीत देशी दारूच्या दुकानाबाहेर दारुड्यांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने तब्बल 45 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यानुसार लाखो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. मात्र काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर काहीजण कर्जमाफीसाठी अपात्र ठरले. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये मोठी नाराजी पसरली होती.

येत्या 48 तासांत मुंबईसह या भागांत पडणार मुसळधार पाऊस

तसेच आपल्याला का कर्जमाफी झाली नाही...? यावरूनही त्यांच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती होती. त्याची गंभीर दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात बीकेसीमध्ये काढलेल्या मोर्चादरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी म्हणून त्याची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले होते.

VIDEO : माहितीच्या अधिकारात बदलामुळे अण्णा नाराज, मोदी सरकारवर केली टीका

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण समिती नेमली आहे. सहाय्यक उपनिबंधकांच्या अध्यक्षेखालील या समितीमध्ये जिल्हा बँकेचा एक प्रतिनिधी, लेखापरीक्षक विभागाचा एक प्रतिनिधी आणि सहाय्यक उपनिबंधक कार्यालयातील एक अधिकारी असणार आहे, अशी माहिती सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 09:11 PM IST

ताज्या बातम्या