सरकार करणार 'दूध का दूध और पानी का पानी' आता भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांची होणार शिक्षा

भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची शिक्षा करणारा कायदा लवकरच तयार करण्यात येईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली.

Ajay Kautikwar | Updated On: Mar 13, 2018 02:33 PM IST

सरकार करणार 'दूध का दूध और पानी का पानी' आता भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांची होणार शिक्षा

मुंबई, 13 मार्च : दूध भेसळ करणाऱ्यांविरूध्द सरकार कडक कारवाई करणार आहे. भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाची शिक्षा करणारा कायदा लवकरच तयार करण्यात येईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत दूध भेसळीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली आहे. सध्या दूधात भेसळ करणाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा आहे. मात्र सहा महिन्यांची शिक्षा असल्याने या प्रकरणात लगेच जामीन होतो. ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपीला जामीन होणार नाही. त्यामुळे तीन वर्षाची तरतुद असणारा कायदा लवकरच केला जाईल, असं बापट यांनी सांगितलं.

दुधात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतुद करावी अशी मागणी अनेक आमदारांनी विधानसभेत केली. मात्र जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा आणण्यात अडचणी असल्याचं बापट यांनी यावेळी सांगितले. सध्या दूध भेसळीची तपासणी करण्यासाठी राज्यात ४ मोबाईल व्हॅन आहेत. मात्र ज्या सातत्याने या व्हॅनद्वारे तपासणी व्हायला हवी, ती होत नसल्याबद्दल कबुली देताना संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत समज देण्यात येईल असे सांगत यापुढे तपासण्यांमध्ये अधिक सातत्य असेल अशी ग्वाही बापट यांनी विधानसभेत दिली. मुंबईत येणाऱ्या दुधाच्या गाड्या तसंच राज्यातील काही भागातील गाड्या अचानक या मोबाईल व्हॅनद्वारे तपासण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close