दिवाळीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार,सरकारची नवी डेडलाईन

दिवाळीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार,सरकारची नवी डेडलाईन

आता दिवाळीआधी शेतकरी कर्जमाफी देणार असल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी सांगितलंय. ते पुण्यात बोलत होते.

  • Share this:

28 सप्टेंबर : शेतकरी कर्जमाफीचा 1 ऑक्टोबरचा वायदा चुकल्यानंतर राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी आणखी एक डेडलाईन दिलीये. आता दिवाळीआधी शेतकरी कर्जमाफी देणार असल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी सांगितलंय. ते पुण्यात बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफीसाठी दिलेली 1 आॅक्टोबरची डेडलाईन हुकली. कर्जमाफीसाठी बँकांकडून कर्जमाफीसाठी माहिती न आल्यामुळे कर्जमाफी 1 आॅक्टोबरपासून देण्यात आली नाही असं कारण दिलंय. त्यामुळे  आता 2 आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व गावात चावडीवाचन पूर्ण करण्यात येणार आहे. बँकांनी कर्जमाफीसाठी माहिती उपलब्ध करुन द्यावी आणि आधार संलग्न नसणाऱ्या शेतकऱ्यांनी  तत्काळ आधार कार्डशी संलग्न व्हावं असं आवाहन केलंय.

आतापर्यंत 56 लाख 59 हजार ३९३ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये 2 लाख 41 हजार 628 शेतकऱ्यांनी आधार कार्डचा क्रमांक दिलेला नाही तसंच या अर्जांमध्ये 77.26 लाख खातेदारांचा समावेश आहे.

एकीकडे कर्जमाफीची आकडेवारी सरकारने जाहीर केली पण बँकाकडून माहिती मिळाली असं कारण पुढे करण्यात आला. आता दिवाळीआधी कर्जमाफी दिली जाईल असा दावा करण्यात आलाय. निदान आतातरी राज्य सरकार हा वायदा तरी पाळणार का, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 08:41 PM IST

ताज्या बातम्या