पावसाळी अधिवेशन: विरोधकांची मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर टीका

पावसाळी अधिवेशन: विरोधकांची मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर टीका

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या आधीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे मांडत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक प्रयत्न करताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 जून- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या आधीचे  हे शेवटचे अधिवेशन आहे. पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारव कडाडून टीका केली आहे. तसेच शिवसेनेलाही लक्ष्य केले आहे.

सरकार नेहमी अधिवेशन गुंडाळण्यात पटाईत, पण यंदा आम्ही सरकारला उत्तर मागू, असा निर्धार विरोधकांनी केला आहे. सत्तेसाठी पक्ष बदलणारे विखे आहेत, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. गृहनिर्माण विभागावर टीका करणारे आता काय करतात बघू, असेही थोरातांन म्हटले आहे.

दुसरीकडे, लोकसभा निवडणूक मोठ्या यशानंतर सत्ताधारी भाजप-शिवेसना आत्मविश्वास वाढला आहे. अधिवेशन आधी मंत्रिमंडळ विस्तार करत नाराज असलेल्यांना खूश करण्साचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे. तर दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या अरोप असलेले प्रकाश मेहता यांना राजीनामा घेतला यामुळे अधिवेशनातील हवाच काढून घेतली.

LIVE UPDATES:

- अधिवेशनाला प्रारंभ होण्याआधीच विराेधक आक्रमक झाले आहेत.

- विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठिय्या मांडला आहे. शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी..अशा घोषणा करण्यात येत आहेत.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आल्यानंतर विरोधकांच्या सरकारच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. आसाराम गयाराम जय श्रीराम, विरोधकांच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिले आहे. 'मी माझी भूमिका सभागृहात मांडेल बाहेर मी बोलत नाही.' असे मुख्यमंत्री म्हणाले.

- भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांची विरोधकांवर टीका विरोधकही आता जय श्रीरामच्या घोषणा करत आहे. विजय वडेट्टीवार हे आयाराम गयाराम यावर बोलतात हे चांगलेच...ते आधी कोठे कोणत्या पक्षात होते हे सगळ्यांना माहिती असल्याचा टोमणा  मुनंगटीवार यांनी मारला आहे.

- आम्ही आयाराम गयाराम जय श्रीराम म्हणतोय फक्त जय श्रीराम नाही- पृथ्वीराज चव्हाण

- भाजप पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष नाहीये, दुस-या पक्षातले नेते पक्षात आणून चालविणारा पक्ष आहे. हे माॅडेल किती दिवस चालेल ते माहिती नाही- पृथ्वीराज चव्हाण

- लोकसभेतील विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात 25 फुटी हार घालून भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले मुख्यमंत्री विधानभवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. नंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर फडणवीस यांना हार घालून स्वागत करण्यात आले आहे.

- राधाकृष्ण विखे पाटील आता सत्ताधारी बाकांवर मुख्यमंत्र्यांचा रांगेत बसले आहेत. मुख्यमंत्री, त्यांच्या शेजारी चंद्रकांत पाटील आणि त्याच रांगेत बाजूला आता राधाकृष्ण विखे पाटील बसले आहेत. तत्पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांची भेट घेतली.

- सीएम हे विरोधी पक्षाचे आमदार घोषणा देताना आले असताना घोषणेचा आवाज एकदम कमी झाला. सीएम यांची दहशत यातून दिसून येते. - अजित पवार

- एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते ते नंतर मंत्री झाले, राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते झाले ते आता मंत्री झाले आता तरी त्यांना विरोधी पक्ष नेते राहु द्यात. मुख्यमंत्री साहेब निवडणुका होईपर्यंत तरी त्यांना विरोधी पक्ष नेते राहू द्यात- सुधीर मुनगंटीवारांचा टोला

- लोकशाहीत ज्यांना पक्ष बदलायचा असेल तर बदलता येतो- विजय वडेट्टीवार

- सत्ता आली तर त्या बाजूला येईल आणि नाही आला तर तिकडेच राहीन- विजय वडेट्टीवार

- विरोधी पक्ष नेते पदावर मी योग्य वेळी निर्णय घेईल - हरीभाऊ बागडे, विधान सभा अध्यक्ष

मुख्यमंत्र्यांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला

- अजित पवारांचा गुलाबराव पाटीलांना टोला, निष्ठावंतांना बाजूला ठेवून नव्या लोकांना मंत्री केलं जातंय.

- एका पक्षात राहून दुस-या पक्षाच्या आमदारांना मंत्री करता येत नाही, पण राजीनामा दिला असल्यास मंत्री होता येतं. - मुख्यमंत्री

- पीजी मेडीकल मराठा आरक्षण प्रवेशा संदर्भात काढण्यात आलेला आदेश सरकारने पटलावर ठेवला आहे.

- छगन भुजबळ यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली, अजित पवार आणि इतर विरोधक टीका करत असताना अभिनंदन ठराव भुजबळ मांडण्याची भूमिका सगळ्यांना आश्चर्यकारक असल्याची चर्चा सुरू झाली.

- मुख्यमंत्र्यांनी आधीच अभिनंदन केलं असल्यानं छगन भुजबळ यांनी नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा प्रस्ताव विधान सभा अध्यक्षांनी मान्य केला नाही.

दरम्यान, तीन आठवडे चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात निवडणूक आधीचे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून महत्त्वाचे विधेयक ही मंजूर केले जातील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन राजकीय घडामोडीचे केंद्र बिंदू ही ठरणार आहे. विरोधी पक्ष नेते विखे हे आता सतेताधारी बाकावर आलेत सध्या तरी विरोधी पक्ष नेत्याशिवाय विधानसभा कामकाज चालणार आहे.


VIDEO: 'विकासाची सगळी स्वप्न भंग, सरकार मात्र विस्तारात दंग'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 11:35 AM IST

ताज्या बातम्या