कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही - मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना कायमचं कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2017 03:17 PM IST

कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही - मुख्यमंत्री

10 एप्रिल : राज्यसरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही. पण कर्जमाफीमुळे प्रश्नही सुटत नाहीत, असं सांगतानाच शेतकऱ्यांना कायमचं कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा योग्यवेळी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचं दर रविवारी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण केलं जाणार आहे.

काल या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात  शेतीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्याविरोधात नाही पण तो एकमेव पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय, त्यामुळे महाराष्ट्रातही कर्जमाफी देण्यासाठी देवेंद्र सरकारवर मोठा दबाव आहे.

आपण कर्जमाफीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ते पुन्हा कर्जच काढू नयेत अशी स्थिती करायची आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कर्जमाफीमुळे आम्हाला राजकीय फायदा होईल. पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी म्हणून विरोधकांबरोबर शिवसेनेही सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. राज्यातील शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे शेती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी त्यांचे अर्थसहाय्य मिळावे म्हणून पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग आणि आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...