खुश खबर...72 हजार जागांसाठी मेगा भरती, ही आहे पदांची यादी

महसूल,कृषी, आरोग्य, PWD, गृह,जलसंधारण, वित्त अशा विविध विभागांमध्ये ही मेगाभरती होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2018 08:40 PM IST

खुश खबर...72 हजार जागांसाठी मेगा भरती, ही आहे पदांची यादी

 प्रफुल साळुंखे,  मुंबई , 04 डिसेंबर : मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. 72 हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. पुढच्या आढवड्यात त्याची जाहीरात प्रसिद्ध होणार आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परिक्षा होईल. प्रत्येक विभाग निहाय ही भरती प्रक्रिया होणार असून एकाच दिवशी 72 हजार पदांसाठी परिक्षा होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारीला सुरुवात केलीय. महसूल,कृषी, आरोग्य, PWD, गृह,जलसंधारण, वित्त अशा विविध विभागांमध्ये ही मेगाभरती होणार आहे.


अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली होती. राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी  काही महिन्यांपूर्वी ही मेगाभरती राज्य सरकारनं घोषीत केली होती मात्र त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती.


ही आहे संपूर्ण यादी...

Loading...


कृषी विभाग


कृषी सेवा वर्ग 1,2, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक


पशुसंवर्धन  

सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, पशुधन पर्यवेक्षक, परिचर


दुग्धविकास

अभियांत्रिकी गट (कनिष्ठ)

दुग्धविकास-अभियांत्रिकी गट, दुग्धसंवर्ध, प्रारण, दुग्धशाळा आणि कृषी पर्यवेक्षक, दुग्धसंकलन विकास अधिकारी आणि तंत्रज्ञ


मत्सव्यवसाय  

सहायक आयुक्त, मत्सव्यवसाय विकास अधिकारी, सहा. मत्सव्यवसाय विकास अधिकारी


ग्राम विकास विभाग

आयुर्वेदिक वैद्य, वैद्यकीय अधिकारी-वर्ग 3, अवैद्यकीय पर्यवेक्षक, युनानी हकीम, कृषी अधिकारी, कनिष्ठ अभियंता

विस्तार अधिकारी श्रेणी-2, विस्तार अधिकारी श्रेणी -3, साथरोग वैद्यकीय अधिकारी, सार्व. आरोग्य परिचर, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कृष्ठरोग तंत्रज्ञ,आरोद्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आरोग्य सहा (महिला),विस्तार अधिकारी (कृषी),स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहा.पशुधन विभाग अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक,प्रयोगशाळा सहायक,पर्यवेक्षिका,कनिष्ठ अभियंता,जिल्हा सार्व.परिचारिका,विस्तार अधिकारी (आयु),प्रशिक्षित दाई,विकास सेवा गट-क,गट-ड,


सार्वजनिक आरोग्य विभाग

वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट क (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट ड (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे),


गृह विभाग

पोलीस उप अधीक्षक,वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकरी,सहायक गुप्ता वार्ता अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस शिपाई,


सार्वजनिक बांधकाम

सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)


मृद व जलसंधारण विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)


वित्त विभाग

सहायक संचालक,कनिष्ठ लेखापाल  

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना अशी भरती का करण्यात येत आहे असा सवाल विरोधी पक्षांसह विविध संघटनांनी विचारला होता. त्यावर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून इतर पदांसाठी भरती आहे असा सरकारचा युक्तिवाद होता. मात्र जास्त विरोध झाल्याने शेवटी सरकारला हा निर्णयच स्थगित करावा लागला. आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याने सरकारने ही मोठी घोषणा केली.

'कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात सभा घेणार'; उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...