News18 Lokmat

अॅट्रॉसिटी खटल्यांच्या जलदगतीसाठी ६ विशेष न्यायालयं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

राज्यात २०१८ मध्ये अॅटॉसिटीच्या १३४१ केसेस  दाखल करण्यात आल्या

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 08:02 AM IST

अॅट्रॉसिटी खटल्यांच्या जलदगतीसाठी ६ विशेष न्यायालयं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

अॅट्रोसिटी प्रकरणातील खटल्यांचा लवकरात लवकर निवाडा व्हावा यासाठी सहा विशेष न्यायालयांची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे आणि नाशिक येथे ही न्यायालयं स्थापन करण्यात येतील.  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

राज्यात अॅट्रोसिटी प्रलंबित केसेस लवकर निकाली लागाव्यात यासाठी पुणे आणि नाशिक यासह ६ ठिकाणी विशेष अॅट्रोसिटी न्यायालय असतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यापूर्वी चार ठिकाणी न्यायलय कार्यरत असून नाशिक आणि पुणे येथे नवीन कोर्ट असेल. या कोर्टात फक्त अॅट्रोसिटी केसेस निकाली जातील. राज्यात २०१८ मध्ये अॅटॉसिटीच्या १३४१ केसेस  दाखल करण्यात आल्या.

नाशिक - २१२

कोल्हापूर -३०२

औरंगाबाद - १५४

Loading...

कोकण - १०६

नांदेड - १६६

अमरावतीत - २०३

नागपूर -१८२

VIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 08:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...