S M L

आजपासून शेतकरी संपावर, राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

बाजारात दूध व भाजीपाला आणू नये, संपकऱ्यांचं आवाहन

Samruddha Bhambure | Updated On: Jun 1, 2017 12:25 PM IST

आजपासून शेतकरी संपावर, राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

01 जून : आपण शाळेत असताना आपल्याला काल्पनिक विषयांवर निबंध लिहायला सांगायचे. त्यात 'सूर्य उगवला नाही तर...', 'शेतकरी संपावर गेला तर...' असे कल्पनात्मक विषय हमखास यायचे. पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही काल्पनिक गोष्ट सत्यात उतरली आहे. शेतकरी खरोखरच संपावर गेला आहे आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसादही उमटू लागले आहेत.

शिर्डी आणि नगरमध्ये दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून देण्यात आले आहेत, तर भाजीपालाही रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. साताऱ्यात वारणा दूध डेअरीच्या 2 टँकर्सची आंदोलकांनी तोडफोड केली आहे. नाशिक, नगरमधल्या जवळपास सर्वच बाजार समित्याही ओस पडल्या आहेत. मनमाडमध्येही संपाचे तीव्र पडसाद उमटताना दिसताहेत, बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

बाजारात दूध व भाजीपाला आणू नये असे आवाहन संपकऱ्यांनी केले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परिणामी मुंबई, पुणे आदी प्रमुख शहारांतील दूध व भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार असून शुक्रवारपासून दूध, भाजीपाल्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.कर्जमाफी आणि हमीभाव यांसह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज, गुरुवारपासून पुकारण्यात आलेला संप यशस्वी करण्यासाठी किसान क्रांती समन्वयकांनी कंबर कसली आहे. मध्यरात्रीपासून भाजीपाला, दूध आणि शेतमाल शहरात जाऊ न देण्याचा निर्धार गावोगावी करण्यात आला आहे.

दैनंदिन गरजेच्या कृषिमालाची कोंडी करण्यासाठी शहराकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर नजर ठेवली जाणार आहे. शहरांकडे जाणाऱ्या महामार्गावर कृषिमालाची वाहतूक करणाऱ्यांना रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Loading...
Loading...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 09:04 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close