अखेर कर्जमाफीला मुहूर्त मिळाला,बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार ?

अखेर कर्जमाफीला मुहूर्त मिळाला,बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार ?

उद्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

  • Share this:

16 आॅक्टोबर : राज्य सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफी वाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. उद्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

राज्य सरकारने 24 जून 2017 रोजी शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी जाहीर केली. राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे. मात्र, कर्जमाफीचे ढिसाळ नियोजनामुळे कर्जमाफीची चाल ढकल सुरू होती. अखेर दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याचं निश्चित झालंय.  कर्जमाफीची रक्कम येत्या बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

कर्जमाफी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मंगळवारी घोषणा होणार आहे. ही कर्जमाफी ऐतिहासिक असल्यामुळे फडणवीस सरकारने कर्जमाफी सोहळ्याचं आयोजनही केलंय. या सोहळ्याला उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार की नाही हे अजून कळलं नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 09:28 AM IST

ताज्या बातम्या